
अमळनेर:- आज दि २६ डिसेंबर रोजी संत सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल रुख्माई संस्थान अमळनेरच्या वतीने परतीच्या वारीचे आगमन होत आहे. प.पू. गुरुवर्य प्रसाद महाराज यांची परतीची वारी अमळनेर नगरीत येणार आहे. या वारीचे आगमन दुपारी ११.३० वाजता होईल. यासाठी वाडी संस्थान येथे जय्यत तयारी करण्यात आली
आहे.

तर दुसऱ्या दिवशी सालाबादाप्रमाणे शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी, अंबऋषी टेकडी येथे संध्याकाळी ६.३० वाजता खिरापतीच्या काला भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. ३० डिसेंबर रोजी, संत सखाराम महाराज समाधी मंदिर येथे अमावस्या काला भजन आयोजित करण्यात येईल.हे भजन सकाळी ११ ते १२ या वेळेत होईल.
त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी ते फिरस्तीसाठी मार्गस्थ होतील.




