
आज सायंकाळी अंबर्शी टेकडीवर होणार खिरापतीचे काला भजन
अमळनेर -येथील संत सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल रुक्माई संस्थान अमळनेरच्या वतीने आयोजित संत प्रसाद महाराजांच्या परतीच्या वारीचे काल 26 रोजी आगमन होऊन वारीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या वारीचे आगमन बहादरपूर मार्गे झाल्यानंतर दुपारी 11.30 वाजता खाटेश्वर मंदिरा जवळील वेशीवर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी प पु संत प्रसाद महाराज यांचे स्वागत केले.त्यांनतर वाजतगाजत वारी बोरी पात्रातील समाधी स्थळी दाखल होऊन तेथुन वाडी संस्थांन मध्ये दाखल झाली. वाडी संस्थान येथे स्वागताची जय्यत तयारी कारण्यात आली होती. येथेही जल्लोषात स्वागत झाले. यावेळी शहरातील मान्यवर व असंख्य भाविक व सेवेकरी उपस्थित होते.
आज दुसऱ्या दिवशी सालाबादाप्रमाणे शुक्रवार, दि. 27 डिसेंबर रोजी, अंबऋषी टेकडी येथे संध्याकाळी 6.30 वाजता खिरापतीच्या काला भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.तर सोमवार, दि. 30 डिसेंबर रोजी, संत सखाराम महाराज समाधी मंदिर येथे अमावस्या काला भजन आयोजित करण्यात येईल.हे भजन सकाळी 11ते 12 या वेळेत होईल.त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी ते फिरस्तीसाठी मार्गस्थ होतील.




