
अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रिकेट पुरुष व महिला स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयातील महिला व पुरुष संघाने विजेतेपद पटकावले.

एरंडोल विभागातील ९ क्रिकेट संघ यात सहभागी होते.अंतिम सामन्यात प्रताप पुरुष संघाने अभियांत्रिकी महाविद्यालय,बांभोरी जळगांव संघाचा तर प्रतापच्या महिला संघाने महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,चोपडा संघाचा पराभव केला .रोहित वंजारी, कार्तिक काळे , राहुल पाटील, सुरज मोरे,अनन्या जोशी, सृष्टी शिंदे, भाग्यश्री पाटील, अश्विनी भावसार या प्रतापच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला.आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी सर्व संघातील उत्कृष्ट खेळाडूंची निवड होईल तसेच २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान या स्पर्धा मुळजी जेठा महाविद्यालय,जळगाव येथे संपन्न होतील.
प्रतापच्या खेळाडूंच्या या यशाबद्दल खा. शि. मंडळ अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष माधुरी पाटील,जितेंद्र देशमुख, विश्वस्थ वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष निरज अग्रवाल,जेष्ठ संचालक हरी भीका वाणी,संचालक योगेश मुंदडा,डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल,खा. शि.मंडळ सचिव व प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन, सहसचिव डॉ. धीरज वैष्णव,उप प्राचार्य प्रा. पराग पाटील,डॉ.विजय तुंटे, डॉ. अमित पाटील,डॉ.कल्पना पाटील,डॉ.व्ही बी मांटे, डॉ.योगेश तोरवणे,जिमखाना समन्वयक डॉ. संदीप नेरकर,अंतर्गत अभिवचन कक्ष प्रमुख डॉ. मुकेश भोळे,स्पर्धा संघ व्यवस्थापक व वरिष्ठ विभाग क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,कनिष्ठ क्रीडा विभाग संचालक प्रा.अमृत अग्रवाल,कुलसचिव राकेश निळे, प्रा.अर्चना पाटील,प्रशिक्षक संजय पवार, सचिन पवार,प्रशांत(बाळू) देवकाते व सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी, खेळाडू यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

