
अमळनेर:- शहरातील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववी मध्ये शिकणारा कृष्णा विलास जाधव याची केरळ येथे एनसीसी ट्रेकिंग कॅम्प साठी निवड झाली असून, सदर कॅम्प 21 ते 28 डिसेंबर या कालावधीत केरळ मधील कोल्लम जिल्ह्यातील कुलथुपुझा येथे आयोजित केलेला आहे तर दुसरा विद्यार्थी आयुष दीपक सोनवणे याची एक भारत श्रेष्ठ भारत या कॅमसाठी कामठी येथे निवड झाली आहे सदर कॅम्प हा 24 डिसेंबर ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत नागपूरमधील ओ टी ए कामठी येथे आयोजित केलेला आहे, 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत साने गुरुजी विद्यालयात एनसीसीचे युनिट चालविले जाते.

सदर विद्यार्थ्यांना कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे, ॲ डम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल पिनाकी बनिक , एनसीसी ऑफिसचे लिपिक सुनील सोनार व विद्यालयाचे एनसीसी ऑफिसर समाधान पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे सदर निवडी बाबत कृष्णा व आयुष्य यांचे शाळेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले




