
अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथील ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये सरपंच पदी सौ रत्नबाई सुनील परदेशी तर उपसरपंच पदी चेतन विनायक शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सदस्य चैताली परदेशी, कुणाल पाटील,सविता परदेशी, शोबाबाई भिल,रतन भिल उपस्थित होते. तसेच निवडणूक अधिकारी म्हणून श्री शिंदे,तलाठी जोगी ग्रामविस्तार अधिकारी समाधान निकम यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामस्थ शंकर पाटील,गणेश परदेशी,रमेश परदेशी, कपिल परदेशी, उदय पाटील,दिलीप पाटील,वासुदेव त्रिमले, सुभाष परदेशी, मगन कोळी,एकनाथ पाटील हितेश परदेशी,नाना परदेशी,योगेश त्रिमले सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




