
अमळनेर:- येथील क्रांतीज्योती महिला ग्रुप यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी व महिला वर्गासाठी विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेत विद्यार्थी गटासाठीही निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,या निबंध स्पर्धेत सेंट मेरी हायस्कूल मंगरूळ या शाळेचा विद्यार्थी चि.कार्तिक निलेश पाटील याने विद्यार्थी गटातून प्रथम येण्याचा सन्मान मिळवला त्यास सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले त्याच्या या यशाबद्दल तालुक्याचे प्र. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील सेंट मेरी शाळेच्या प्राचार्य व शिक्षक वृंदांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले.




