
अमळनेर:- आज 31 डिसेंम्बर रोजी 2024 वर्षाला निरोप आणि 2025 या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अमळनेरकर सज्ज झाले आहेत. यासाठी शहरात कुटुंबीयांसाठी हॉटेल आणि मद्यप्रेमींसाठी परमिट रूम बियरबार वर रोषणाई देखील करण्यात आली आहे.

नववर्षानिमित्त अमळनेर मधील देशी,बियर शॉप आणि वाइन शॉप रात्री एक वाजे पर्यंत खुले राहणार आहेत तर परमिट रूम, बियरबार हॉटेल, रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अमळनेर पोलीस दलाने देखील 31 डिसेंबर निमित्त विशेष तयारी केली आहे, शहरात पोलीस दलातर्फे पैलाड, गलवाडे रोड आणि धुळे रस्त्यावर नाकाबंदी करण्यात येणार आहे तसेच शहरातील मुख्य चौकात,आणि संवेदनशील भागात पोलिस विशेष गस्त घालणार आहेत,इतकेच नव्हे तर दारू पिउन गाडी चालवणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे तेंव्हा सरत्या वर्षाला निरोप द्या मात्र सांभाळून अन्यथा आपल्यावर पोलीस कारवाई होऊ शकते.




