
मायलेकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
अमळनेर:- तालुक्यातील चौबारी येथे किरकोळ कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण करून अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने मायलेकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चौबारी येथील ३८ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर महिला पती, मुलगा व १७ वर्षीय मुलीसह राहत असून पती व दोन्ही मुले दिव्यांग आहेत. १७ डिसेंबर रोजी त्यांच्या घरासमोर राहणारे दीपक सुरेश पाटील व त्याची आई सुरेखा सुरेश पाटील हे आले व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. सदर महिलेच्या पतीला मारहाण करू लागले त्यावेळी महिला बचाव करू लागली असता दीपक याने महिलेच्या छातीवर मारत दोघी मुलांनाही मारहाण केली त्यावेळी गावातील लोकांनी त्यांची सुटका केली. तसेच तुम्ही आमच्याविरुद्ध केस केल्यास आम्ही आत्महत्या करून तुमचे नाव टाकून देऊ अशी धमकी दीपक व सुरेखाबाई यांनी दिली. तसेच दीपक हा फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन मुलीला हातवारे करून इशारा करत असे व लज्जा वाटेल असे कृत्य करत असे त्यावरून मारवड पोलिसात ॲट्रोसिटी, पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप करीत आहे.




