
अमळनेर :- आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धा ता.29 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत पार पडत आहेत. नाशिक विभागात एकूण सात प्रकल्प अंतर्गत यावल प्रकल्पाचे नेतृत्व पिंपळे ता. अमळनेर येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी केले आहे.

यावेळी क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ,सवित सिताराम पावरा या विद्यार्थ्यांने १७ वर्ष वयोगटात ६०० मीटर धावणेप्रकारात द्वितीय व वासुदेव भीमसिंग पावरा यांने १९ वर्ष वयोगटात १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला , १९ वर्ष वयोगटात लांब उडी मध्ये वासुदेव पावरा याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली असून या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, संस्थेचे अध्यक्षा विद्या पाटील ,संस्थेचे सचिव युवराज पाटील, मुख्याध्यापक प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




