
मुख्याधिकारी वेवो तोलू केझो यांचे आदेश…
अमळनेर:- परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी वेवो तोलू केझो यांनी आढावा घेऊन थकबाकी मोठया प्रमाणावर असून तात्काळ जप्तीची कारवाई करावी असे आदेश दिले. दि २ रोजी सर्व विभागांना भेटी देऊन वसुली विभागाचा विभागनिहाय आढावा घेतला. व कामकाज कसे चालते हे समजून घेतले व नागरिकांची कामे कसे तात्काळ होईल यासाठी प्रयत्न करावेत यासाठी मार्गदर्शन केले.

परिविक्षाधीन आयएएस अधिकारी तथा मुख्याधिकारी वेवो तोलू केझो यांनी पालिकेतील सर्व विभागाना भेट देऊन, विभागवार आढावा घेऊन कामकाज कसे चालते, व नागरिकांची कामे तातडीने कशी पूर्ण करावीत या विषयी मार्गदर्शन केले.
कडक मोहीम सुरू करण्याचे आदेश –
वसुली विभागात घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ती तात्काळ वसूल करा. प्रभागनिहाय पथके तयार करून थकबाकी जमा करत असतील तर वसूल करा अन्यथा जप्तीची मोहीम सुरू करा. जर कुणी वसुलीस अडथळा आणेल तर पोलिसांत गुन्हा नोंदवा असे आदेश दिले.
पालिका प्रशासन अलर्ट मोडवर – पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले असून मंगळवारी पदभार घेतला असून बुधवारी सफाई कामगारांची हजेरी घेतली सकाळीच धुळे रस्ता साफसफाई मोहीम त्यांच्या निगराणी खाली राबविण्यात आली. सर्व अधिकारी सफाई मुकादम सफाई कामगार पहाटेच हजर होते. त्यामुळे सर्व प्रशासन कर्मचारी अलर्ट मोडवर आले आहेत.




