
अमळनेर : पोलिसांना माहिती देतो या संशयावरून दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ याने एकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना ३१ रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास सुभाष चौकात घडली.

राहुल रमेश भोई वय २९ रा शिवशक्ती चौक हा त्याच्या मित्रांसोबत ३१ रोजी सुभाष चौकात उभा असताना दादू उर्फ राजेश निकुंभ याने राहुल ला हटकले की तू पोलिसांना माहिती देतो. त्यावरून दादूधोबी याने हातातील चाकूने राहुल च्या मानेवर वार केला. खांद्यावर तो वार झेलल्याने जखमी झाला.त्याच्या मित्रांनी भांडण आवरल्यानन्तर दादू ने धमकी दिली की ‛आज तो बच गया लागली बार छोडुंगा नही ‘’ म्हणत निघून गेला. मित्रांनी राहुलला दवाखाण्यात नेले. त्यांनतर अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून तप्पास सहाययक पोलीस निरीक्षक जगदीश गावित करीत आहेत




