
अमळनेर:- तालुक्यातील जैतपीर येथील एकाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील जैतपीर येथे सुनील लक्ष्मण पाटील (वय -३७) हा रहात होता.२ रोजी रात्री तो घरात झोपलेला होता,मात्र ३ रोजी सकाळी ९ वाजता पूनम गोकुळ कोळी हे सुनील पाटील यांच्या घराकडे गेले असता त्यांनी सुनील पाटील यांना उठविण्याचा प्रयत्न केला,परंतु सुनील पाटील हे कुठीलीही हालचाल करत नसल्याने त्यांनी गावातील पोलीस पाटील गोविंदा लोटन पाटील यांना फोन करून कळविले. त्यांनतर सुनील पाटील यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले,यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.




