
अमळनेर:- शहरातील राजाराम नगर येथे क्रांती-ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती अभिवादन करण्यात करण्यात आले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी राजाराम नगरमध्ये अनेक वर्षांपासून सेवा देत असलेले आदिवासी कुटुंबातील मालुबाई भिल यांचा हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले तसेच परीसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सावित्रीमाईंचा कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला व दाऊद पिंजारी (विधी तज्ञ) यांनीही आपल्या भाषणातून सावित्रीमाईंनी समाजासाठी दिलेलं योगदानावर आपले विचार मांडून उपस्थित परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते पिंटू गुजर, रवि संदानशिव(विभागीय सचिव,शिवसेना रा.प.म), एस.एम.पाटील,प्रकाश शिंदे, सुनील बैसाणे(प्रताप कॉलेज), प्रदीप जाधव,किशोर महाजन, क्षत्रिय भावसार समाजाचे अध्यक्ष पंकज भावसार, रवि चौधरी, गणु चौधरी, गुलाब पेंटर,नितीन महाजन,गजू मराठे,रझाक दादा,अभिजित महाजन,सोनु मेहतर,विक्की चौधरी,अनिल पाटील आदींनी मेहनत घेतली तसेच ब्रदर्स अकॅडमीचे संचालक मनोज माळी सर यांनी सूत्रसंचालन तर निलेश पाटील यांनी आभार मानले.




