
अमळनेर: करुणा क्लब चेन्नई या संस्थेच्या वतीने २८ व २९ डिसेंबर रोजी तखतगड(जोधपुर) येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अमळनेर शहरातील स्व.सौ.पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयास वर्षभर चांगले उपक्रम राबविल्यामुळे व पी.पी.टी. च्या माध्यमातून अहवाल सादर केल्यामुळे भारतातून दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्रदान करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक पी.एस.विंचुरकर,करूणा शिक्षक गोकुळ बोरसे, सुनील पाटील उपस्थित होते.सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन जिल्हा सत्र न्यायाधीश नरेंद्र सिंह मालावत तसेच करुणा इंटरनॅशनलचे अध्यक्ष एस.शांतीलाल, चेअरमन कैलासमल दुग्गड, जनरल सेक्रेटरी सज्जनराज सुराणा, उपाध्यक्ष पदमचंद्जी छाजेड, सुरेशजी कांकरिया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा तसेच संस्थेचे सहसचिव योगेश मुंदडा व संचालक राजू मुंदडा यांनी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सह सर्वांचे अभिनंदन केले आहे.




