
अमळनेर : तालुका हिंदी अध्यापक मंडळातर्फे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत लहान गटातून अल्फाईज उर्दू गर्ल्स स्कूल ची ऐयमन अस्लमोद्दीन काझी इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी प्रथम तर मोठ्या गटातून इयत्ता १० वी ची खुशी अनिस शेख हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सानेगुरुजी पतपेढीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी गस चे माजी अध्यक्ष व हिंदी अध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील , संदीप घोरपडे , प्रकाश पाटील , ज्ञानेश्वर इन्श्युलकर , ईश्वर महाजन ,दिलीप पाटील , अनिल चौधरी , राजेंद्र पाटील ,एन आर चौधरी , उघडे सर , निलेश पाटील ,आशिष शिंदे , मुस्ताक शेख, प्रतिभा जाधव , उदय पाटील , सर्व हिंदी विषय शिक्षक हजर होते. सूत्रसंचालन दीपक पवार यांनी तर आभार दिलीप पाटील यांनी मानले.




