
अमळनेर : नगरमार्गे पुणे जाणाऱ्या अमळनेर आगाराच्या एस टी बस ने मागाहून पुढच्या वाहनाला धडक दिल्याने सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

अमळनेर पुणे बस क्रमांक एम एच २० बी एल २४०१ ही दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास नगरबायपास वरून जात असताना पुढच्या वाहनाला धडक लागल्याने चालक उमेश सोनवणे (शिरूड) सह बसमधील सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने अनर्थ टळला. बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बसचे वाहक किरण पारधी यांनी आगार प्रमुख प्रमोद चौधरी तसेच चालक मनोज पाटील यांच्याशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली.




