
योगा भवनात बाळशास्त्री जांभेकरांचे प्रतिमा पूजन
अमळनेर -सालाबादप्रमाणे आज 6 जानेवारी रोजी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळील योगा भवनात बाळशास्त्री जांभकरांचे प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे.

आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जात असतो.अमळनेर येथे आजी माजी आमदार आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा पत्रकार दिन सोहळा पार पडणार आहे.यावेळी काही मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.सकाळी ठीक 10 वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार असून सदर प्रसंगी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आवर्जून उपस्थिती द्यावी असे विनम्र आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष आर. जे. पाटील व सचिव जितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
जांभेकरांच्या जन्मगावी राबविणार सामाजिक उपक्रम…
पत्रकार दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेकडून आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आज ६ जानेवारी रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभूर्ले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.




