
सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईना, ढेकूरोडवरील नागरिक धुळीने बेजार
अमळनेर:- धड रस्ता पण होत नाही, ना दररोज सकाळ संध्याकाळ पाणी मारले जात नाही मात्र आता रस्त्यावर दबलेली खडी वर आली असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिक खडी लागून जखमी होत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून भुयारी गटार पूर्ण झालेली असून रस्ता होईना अशी परिस्थिती वाहनचालकांची अवस्था धुळ आणि उखडलेली खडीने त्रस्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र लक्ष देईना अशी अवस्था झाली. शहरातील प्रमुख रस्ता असलेला ढेकूरोडवरील नागरिक दोन महिन्यांपासून धुळीने बेजार तर आहेत. आता उखडलेली खडी नागरिकांच्या जीवावर बेतली आहे. कार, ट्रॅक्टर, ट्रक अशा वाहनांनी या उखडलेल्या खड्या उडून नागरिकांना जखमी करत आहेत.यामुळे हा रस्ता कधी होईल असे झाले आहे.
सुखशांती अपार्टमेंट ते नाल्यापर्यंत अर्धा रस्ता कच्चा तयार केलेला होता. आधी धुळीने नागरिक त्रस्त होते. आता धूळ आणि उखडलेली खडी जीवावर बेतली आहे.
पिंपळे रस्त्यावर अद्याप फरशी पूल तयार झाला नाही मात्र त्यामुळे नागरिकांना तिकडून येता येत नाही. धड पिंपळे रस्ता ना ढेकूरोड कोणताही रस्ता वापरायला नाही.
धुळीने ऍलर्जी श्वसनाचे विकारांनी त्रस्त-
ज्यांना श्वसनाचा विकार आहे. घास,दमा, धुळीने होणारी सर्दी यामुळे श्वसन करण्यास अडचण होत आहे. मात्र प्रकाराकडे तब्बल २ महिन्यापासून कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे मात्र तोंडाला मास्क लावावे लागत आहेत. अनेक जण रुमलाचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे नागरिक कमालीचे वैतागले आहेत. मात्र याच रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय आहे. त्यात एक कार्यकारी अभियंता, दोन उपविभागीय अभियंता कार्यालये याठिकाणी असून असून देखील ते डोळ्यावर पट्टी बांधून वापरत आहेत. मात्र त्यांनी कधीही ठेकेदाराला सूचना केली नाही.
कोट – येत्या दोन चार दिवसांत काम सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. आधी डांबरी होता रस्ता उखडला आणि पूर्ण वाया गेला. त्यामुळे तांत्रिक बाबी आम्ही पूर्ण केल्या आहेत. लवकरच रस्ता सुरू होईल. – हेमंत महाजन उपविभागीय अभियंता. सार्वजनिक बांधकाम




