अमळनेर:- येथील खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय व फार्मसी कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन दि.१०,११,१२ जानेवारी २०२५ रोजी उत्साहात संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दि.१० जानेवारी रोजी सकाळी ०९:०० वाजता आनंद मेळवा ,खाद्य व पेय पदार्थांचे विविध स्टॉल व रेकॉर्ड भेट -१ यांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे चिटणीस डॉ. ए.बी. जैन व स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.डॉ.विजय तुंटे आणि प्रा.सी.बी. सुर्यवंशी यांच्या हस्ते होईल यानंतर सकाळी १०:०० वाजता ध्वजारोहण व उद्घाटन समारंभ पार पडेल यावेळी कार्यकमाचे उद्घाटक मा.डॉ.श्री.रोहितजी धर्माधिकारी,मुंबई हे असतील तर अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्री. डॉ.संदेशजी बी. गुजराथी राहतील.
आनंद मेळावा व रेकॉर्ड भेट , क्रीडा विभाग व शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषक वितरण मान्यवरांच्या हस्ते होईल. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रत्येकी आजी-माजी आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा आदर्श कर्मचारी म्हणून सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाईल तसेच फाईन आर्ट गॅलरी व स्पोर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांचे ललित कला आविष्काराचे प्रदर्शन होईल. दुपारच्या सत्रात विविध मनोरंजन भाग-१ विद्यार्थी सादर करतील तसेच संध्याकाळी ०५:३० वाजता युवारंग युवक महोत्सव – २०२४ पुरस्कार प्राप्त कार्यक्रम महाविद्यालयाचे विद्यार्थी सादर करतील.
दि.११ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता काव्यवाचन,फॅन्सी ड्रेस,नाटीका व एकपात्री प्रयोग होणार आहे. दुपारच्या सत्रात विविध मनोरंजन भाग-२ होईल. संध्याकाळी ०५:३० वाजता युवारंग युवक महोत्सव – २०२४ पुरस्कार प्राप्त कार्यक्रम होईल.
दि.१२ जानेवारी रोजी क्रीडा,स्नेहसंमेलन व इतर विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते होईल.यावेळी मा. श्री. दादासो. आमदार अनिलजी भाईदास पाटील (माजी मंत्री,मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन,माझी पालकमंत्री- नंदुरबार जिल्हा) व मा. प्रा. डॉ. अजयजी भामरे (प्र-कुलगुरु,मुंबई विद्यापीठ, मुंबई) प्रमुख अतिथी असतील. अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष मा. श्री. सी.ए. नीरजजी अग्रवाल राहतील.
स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ.ए.बी.जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डॉ.विजय तुंटे (सिनियर कॉलेज) व प्रा.सी.बी. सुर्यवंशी (ज्युनिअर कॉलेज), यांच्यासह सर्व उपप्राचार्य, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य, पर्यवेक्षक,सर्व समित्यांचे प्रमुख,समिती सदस्य,प्राध्यापक बंधु-भगिनी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील आहेत.