
अमळनेर:- ११ रोजी दि. राज्य परिवहन मंडळ आगार अमळनेर येथे विना अपघात सुरक्षितता अभियान २०२५ मोहिमेचे उद्घाटन नायब तहसीलदार प्रशांत धमके यांच्या हस्ते फित कापून व नारळ फोडून करण्यात आले.

तसेच माजी उपमहाव्यवस्थापक माधव देवधर यांनी चालक व यांत्रिक कर्मचारी यांना विना अपघात सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास आगाराचे पालक अधिकारी म्हणून निलेश चौधरी सहा. उपयंत्र अभियंता जळगाव यांनी देखील मौलिक मार्गदर्शन करून असे सांगितले की सदर अभियान हे १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीसाठी नसून आपण वर्षभर विना अपघात सुरक्षित सेवा दिली पाहिजे असे विचार कार्यक्रमात मांडले. सदर कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमोद चौधरी आगार व्यवस्थापक अमळनेर अनिकेत न्हायदे, स.वा.अ. मुकेश सैदाणे, वाहतूक निरीक्षक राकेश चौधरी, अमोल पाटील, तुषार पाटील, विजय वाडेकर,विजय लांडगे, राकेश पाटील, आर एम बडगुजर, योगेश घोडके, शशिकांत पाटील, मनोज पाटील तसेच चालक वाहक व यांत्रिक कर्मचारी व सर्व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद बाविस्कर यांनी केले.




