
अमळनेर : मित्राला घ्यायला गेलेल्या तरुणाला एकाने मारहाण केल्याने त्याचा जबडा फ्रॅक्चर झाल्याची घटना १० रोजी दुपारी ३ वाजता घडली.

जतीन भटू पाटील रा त्रिमूर्तींनगर साई पुष्पा रेसिडन्सी याला १० रोजी त्याचा मित्र कल्पेश विजय खैरनार याने फोन करून मला घ्यायला ये असे सांगितले. जतीन त्याला मोटरसायकलवर घ्यायला गेला असता राधे लखन जाधव रा झामी चौक हा त्याठिकाणी आला व कल्पेश खैरनार याच्याशी भांडू लागला. जतीन त्याच्याजवळ गेला असता राधे याने तोंडावर जोरात बुक्का मारला. त्याचा जबडा फ्रॅक्चर होऊन तोंडातून रक्त येऊ लागले. मित्रांनी डॉ सुमित सूर्यवंशी यांच्याकडे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले तेथून डॉ राजेश पाटील धुळे यांच्याकडे ऑपरेशन केले. जतीन याची आई भाविता भटू पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून राधे जाधव विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५ , ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंके करीत आहेत.




