
संचालकांनी पणन मंत्री आणि पणन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांची घेतली भेट
अमळनेर:- तालुक्यात सी सी आय चे कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावे यासाठी बाजार समिती सभापती अशोक पाटील आणि संचालकांनी पणन मंत्री आणि पणन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन तातडीने केंद्र सुरू करावी अशी मागणी केल्याने सोमवारी पणनच्या अधिकाऱ्यांनी अमळनेर शहरात येऊन शहरातील दोन जीनची व ग्रामीण भागतील शेतकऱ्यांकडे जाऊन चांगल्या प्रतीचा कापूस शिल्लक असल्याची खात्री केली त्यामुळे पुढील दोन तीन दिवसात सी सी आय चे कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता प्रा सुभाष पाटील यांनी व्यक्त केली आहे.

अमळनेर वगळता पारोळा धरणगाव सह इतरत्र केंद्र सुरू झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी असल्याने बाजार समिती अशोक पाटील,संचालक प्रा सुभाष पाटील, नितीन पाटील यांनी पणन मंत्री जयकुमार रावल आणि पणन चे अधिकारी पानिग्रही यांची भेट घेऊन केंद्र सुरू करण्याची मागणी केली त्यावेळी पानिग्रही यांनी सप्ताहात दोन तीन दिवस सुरू राहील असे केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली होती,मात्र तत्पूर्वी पणन चा अधिकारी अमळनेर जाऊन पाहणी करेल व त्याचा अहवाल देईल असे सांगितले होते. सोमवारी पणनचे तेजप्रताप नावाचे अधिकारी आले होते त्यांनी शहरातील लक्ष्मी जीन आणि कॉटन जीनची पाहणी केली तसेच गलवाडे गावात जाऊन चांगल्या प्रतीचा कापूस किती शिल्लक आहे याची खात्री केली यावेळी त्यांच्या सोबत बाजार समितीचा कर्मचारी डिंगम्बर पाटील उपस्थित होते. तत्पूर्वी बाजार समितीत तेजप्रताप यांचे स्वागत करण्यात आले




