
अमळनेर : महसूल विभागाच्या महिला भरारी पथकाने माळी वाड़ा भागात अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला.
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे साहेब तसेच तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती गिरासे मंडळ अधिकारी भरवस, आदिती जरे ग्राम महसूल अधिकारी अमळनेर, रुचिका पाटील ग्राम महसूल अधिकारी हेड़ावे, संगीता भोसले ग्राम महसूल अधिकारी धार, शितल पाटील ग्राम महसूल अधिकारी, श्रीमती भामरे ग्राम महसूल अधिकारी खवशी यांनी कारवाई केली. वाळूने भरलेला टेम्पो पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला.




