
अमळनेर:– तालुक्यातील कपिलेश्वर येथे तापी व पांझरा नदीच्या संगमस्थळी मकर संक्रांतीनिमित्त शाही स्नानासाठी जळगाव, धुळे, नंदुरबारसह संपूर्ण खान्देशातून महिला भाविकांची अलोट गर्दी होऊन पहाटे ५ वाजेपासून सायंकाळपर्यंत १० हजार महिलांनी शाहीस्नान करून पुरातनकालीन श्रीक्षेत्र कपिलेश्वर त्रिपींडी महादेवाचे दर्शन घेतले. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने मंदिर संस्थानकडून महिला स्वयंसेवक तैनात केले होते.
यावेळी पार्थिव शिवलिंग पूजन, ऋषी पूजन, तापी आरती व महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी महाकुंभावर प्रवचन आदी कार्यक्रमाची दिवसभर रेलचेल दिसून आली. महिला भाविकांच्या अलोट गर्दीमुळे निम ते श्रीक्षेत्र कपिलेश्व दरम्यान २ किलोमीटर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या होत्या. मारवड पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील व महिला पोलिसांनी सहकार्य केले. मारवडचे सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, हवालदार सुनील तेली, मुकेश साळुंखे, फिरोज बागवान, अनिल राठोड आदींसह महिला पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. कपिलेश्र्वर मंदिर संस्थानचे सचिव मगन पाटील, विश्वस्त तुकाराम पाटील, उपाध्यक्ष सी.एस. पाटील यांनी महिलांच्या नदीपात्रात स्नानासाठी विशेष काळजी म्हणून महिला स्वयंसेवकांकडून डोहात न उतरता, काठावरच स्नान करण्याच्या सूचना केल्या जात होत्या




