
अमळनेर:- शहरापासून जवळच चोपडा रोड सिंधी कॉलनी जवळ अप रेल्वे लाईन वर ता. 13 रोजी रात्री ८वाजेच्या सुमारास एक इसम वय अंदाजे 30 वर्षे रंग सावळा, सडपातळ बांधा अंगात लाल रंगाचा टि शर्ट,काळ्या रंगाची पॅन्ट उजव्या हाता वर शिव प्रकाश यादव असे नांव गोंदलेले पायात पांढरे रंगाची स्लीपर चप्पल हा रेल्वेखाली कापला गेला आहे. त्याची ओळख पटली नसुन कोणी ओळखत असल्यास अमळनेर पोलीस स्टेशन ला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.याबाबत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बांधवांनीही ही नोंद घ्यावी असेही आवाहन करण्यात आले असून अनोळखी मयताच्या ओळख पटविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.




