
पिंपळे रोड परिसरात भीतीदायक वातावरण, दोघांना धुळ्याला हलवले…
अमळनेर – तालुक्यात एकाच दिवशी १५ रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे १५ जणांना चावा घेतला. पैकी दोघे बालके गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. बहुतेक रुग्ण पिंपळे रोड परिसरातील आहेत.

१५ रोजी सुकलाल गिरधर माळी , मृणाल रवींद्र पवार , असम गंगाराम धनगर , अरुणाबाई हिलाल भिल, सुनीता विश्वास शिरसाठ , आशिष सुधाम बारेला , ओम सुधाकर भिल, विश्वदीप निलेश पाटील , सोपान राजेंद्र पाटील , दक्षता प्रदीप पाटील , भार्गवी धनराज बोरसे , ओंकार केशव मोरे ,संजय भिला पाटील , नलिनी भिका चौधरी , गिरिष शांताराम पाटील अशा एकूण पंधरा जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यात लहान मुले व तरुण नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असुन यातील काहींना धुळे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे पिंपळे रोड वरील जे डी सी सी बँक कॉलनी,श्रीकृष्ण नगर,आल्हादनगर, सुंदरनगर, वर्धमान नगर, वामन नगर आदी भागातील नागरिकांचा समावेश आहे.
याबाबत माजी नगरसेवक विवेक पाटील व काही नागरीकांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सदर घटनेची माहिती देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त होऊ शकला नाही याबाबत नगरपरिषदेने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी सर्वत्र होत आहे.
प्रतिक्रिया…
पशु संवर्धन करणाऱ्या कुसुम भाटिया यांच्याशी संपर्क झाला असून त्या पिसाळलेल्या कुत्र्याला त्यांना न्यायला सांगितले आहे. सकाळी पिसाळलेला कुत्रा त्यांच्या स्वाधीन करण्यात येईल – संतोष बिऱ्हाडे ,आरोग्य निरीक्षक नगरपरिषद अमळनेर
प्रतिक्रिया…
जखमा गंभीर व खोल असल्यास किंवा बालकाला कुत्रा चावल्यास त्यांना अँटी रेबीज सिरम द्यावे लागते ते जिल्हा रुग्णालयात देण्यात येते. व साधा चावा असल्यास त्यांना अँटी रेबीज व्हॅक्सीन ग्रामीण रुग्णालयात देण्यात येते. –डॉ जी एम पाटील , वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय अमळनेर.





