
अमळनेर:- येथील महसुल विभागाकडून वाळू चोरी प्रकरणी पकडलेले ट्रॅक्टर चोरीस गेले असता पोलिसांनी 24 तासात चक्रे फिरवून आरोपीस अटक केली आहे.

लक्ष्मण शांतीलाल भिल याचे अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह कारवाई करीता अमळनेर तहसील कार्यालयात लावण्यात आले होते. दिनांक 14 रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमळनेर तहसील कार्यालयातून वाळूने भरलेले हे ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेल्याने त्याबाबत अमळनेर पो.स्टे.ला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या पथकास चोरीस गेलेले ट्रॅक्टर हे मालक लक्ष्मण भिल याचा लहान भाऊ कमलेश उर्फ कल्पेश भिल रा. मोहाडी ता. जि. धुळे यानेच चोरून घेवून नेले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलिसांनी मोहाडी गावात जावून कमलेश भिल याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.व त्याचे कडून निळया रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली अर्धा ब्रास रेतीने भरलेली असे जप्त करून त्यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी अमळनेर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर,गुन्हे शाखा पो निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, राहुल कोळी सर्व नेम. स्थागुशा जळगाव यांनी केली आहे.




