
अमळनेर:- येथील डॉ.तुषार राजेन्द्र शेलकर. डॉ. शेलकर यांनी नुकतीच MBBS DDV स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोग तज्ञ) म्हणून चिपळूण येथील नामांकित वालवलकर मेडिकल कॉलेज येथून यश संपादन केले.

डॉ.शेलकर हे सध्या सायन हॉस्पिटल मुंबई येथे Dermtologist म्हणून सेवा देत आहेत. ते अमळनेर येथील माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर यांचे नातू असून नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेन्द्र शेलकर व सौ.लता राजेंद्र शेलकर यांचे मोठे चिरंजीव आहेत. त्यांच्या घरात वैद्यकीय शिक्षणाचा वारसा असून त्यांचे लहान बंधू डॉ.विशाल राजेंद्र शेलकर हैदराबाद येथे MS Ortho करीत आहेत. तसेच त्यांचे आतेबंधू डॉ.उपलेश महाजन (स्त्रीरोग तज्ञ), डॉ.पंकज महाजन (MD मेडिसिन), डॉ.मयूर महाजन (DNB भूलरोग तज्ञ) म्हणून अमळनेर येथे आपल्या गणपती हॉस्पिटल व क्रिटीकेअर सेंटरच्या माध्यमातून सेवा देत आहेत. डॉ.तुषार शेलकर यांच्या यशाबद्दल माळी समाज व मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, लवकरच अमळनेर शहरातील नागरिकांसाठी Dermtologist व accident रुग्णालय स्थापन करून रुग्णांची सेवा करणार आहे.


