
अमळनेर:- तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो. एस्.एस्.पाटील माध्य.विद्यालयात बोर्ड पेपर सोडवण्या संदर्भात मार्गदर्शन संपन्न. विद्यार्थी दशेत इयत्ता १० वी च्या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.परीक्षा म्हटली की काही प्रमाणात का होईना भिती ही आलीच पण, योग्य प्रकारे अभ्यासाचं नियोजन व परिक्षेचे स्वरूप समजून घेतल्यास भितीचे कारण नाही.

येत्या दि.२१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान इयत्ता १० वी चे बोर्ड पेपर होणार आहेत. त्या पूर्वी जवळपास सर्वच विद्यालयात विविध विषयांची सराव व पूर्व परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत परिक्षे विषयी भिती नाहीशी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या नुसारच येथील स्व.आबासो.एस्.एस्.पाटील माध्य.विद्यालयात बोर्ड पेपर सोडवण्या संदर्भात अमळनेर येथील साने गुरुजी कंन्या हायस्कूल चे वरिष्ठ शिक्षक व बोर्ड परीक्षा नियामक दिलीप पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या अनमोल मार्गदर्शना बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . सुत्रसंचलन व आभार दीपक मुरलीधर पवार यांनी मानले.सदर प्रसंगी मनोहर देसले, मिलींद पाटील व इतर शिक्षक व शिक्षकेतर बंधू – भगिनी उपस्थित होते.





