
अमळनेर– तालुक्यातील प्र. डांगरी येथील न्यू इंग्लिश स्कूलचा 10 वीचा विद्यार्थी हितेश उत्तम बाविस्कर याने तालुक्यातील ग्रामीण भागातून छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारात सन-2023-24 मध्ये प्रथम पुरस्कार मिळवून विद्यालयाचा मान उंचावला आहे. हितेशला याला पाच हजार रुपये बक्षीस म्हणून मिळणार असून समाज कल्याण विभागामार्फत थेट त्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

हितेश याला मुख्याध्यापक राकेश पवार सर, पी. व्ही. साळुंखे सर, एन. बी. शर्मा सर, आर. टी. बागुल सर, आणि प्रतिभा सोनवणे मॅडम, महेंद्र पाटील सर, सुरेश वाडीले सर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
हितेशचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून पंचक्रोशीत त्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले जात आहे.





