![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250123-WA0042.jpg?fit=1024%2C576&ssl=1)
अमळनेर:- शहरातील श्रीमती.डी.आर.कन्या शाळेत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई आयोजित श्यामची आई संस्कार परीक्षा आयोजित करण्यात आली.या संस्कार परीक्षेत सकाळ व दुपार विभागाच्या दोनशे विद्यार्थीनी सहभाग घेतला.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2024/12/gif_1734710466943-1.gif?resize=640%2C768&ssl=1)
परीक्षेसाठी विद्यार्थिनींना श्यामची आई हे पुस्तक एक महिन्याअगोदर देण्यात आले होते. विद्यार्थिनींनी पुस्तकाचे व्यवस्थित वाचन केल्यावर एक महिन्यानंतर पुस्तकावर आधारित संस्कार परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत उपमुख्याध्यापक व्ही.एम.पाटील, जेष्ठ शिक्षक एस. एस.माळी, गणित शिक्षिका श्रीमती.एल.व्ही.घ्यार, पी.एस.कोतकर यांनी तर दुपार विभागात मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी,पर्यवेक्षिका एस.पी.बाविस्कर,साने गुरुजी संस्कार परीक्षा समन्वयक डी.एन.पालवे यांनी सहकार्य केले. परीक्षा साने गुरुजी यांच्या श्यामची आई पुस्तकावर असल्याने विद्यार्थिनींनी परीक्षा उत्साहात देत होत्या.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/image_editor_output_image1945045255-17373389785377574354205967647335.jpg?resize=640%2C815&ssl=1)