
अमळनेर : डॉ. होमी भाभा फाउंडेशन मुंबई संचलित एम एस ए टी टॅलेंट सर्च परीक्षेत पीबीए इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी मोहित देवरे राज्यातून दुसरा आला असून त्याची इस्रो अवकाश संस्थेला भेटीसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातून घेण्यात येणारी ही परीक्षा प्रतिष्ठेची बौद्धिक कौशल्य पणास लावणारी असते. राज्यातून प्राथमिक फेरीसाठी सव्वा लाख विद्यार्थी या स्पर्धेसाठी बसले होते. स्पर्धेच्या एकूण तीन पात्रता फेरी असतात. विद्यार्थ्यांना याच संस्थेकडून ऑनलाईन मार्गदर्शन देण्यात येते. पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी चि. मोहित सुनील देवरे इयत्ता नववी गटातून महाराष्ट्र राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाला असून त्यास सात हजार रुपये रोख रक्कम बक्षीस व भारतीय अंतराळ संस्था इसरो भेटीसाठी त्याची निवड झाली आहे.
प्रथम पात्रता फेरीत 23 विद्यार्थी, द्वितीय पात्रता फेरीत 21 विद्यार्थी, तिसरी पात्रता फेरीत -(मुलाखत) साठी 2 विद्यार्थ्यांची निवड इंग्लिश मीडियम स्कूल मधून झाली व त्यामध्ये मोहित देवरे व पियुष पाटील हे दोन्ही विद्यार्थी इयत्ता नववी मधून होते. त्यातून मोहित देवरे यांने ऐतिहासिक कामगिरी करून अमळनेर नगरीच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. त्याला विज्ञान व गणित या विषयाचे मार्गदर्शन विज्ञान शिक्षिका सुवर्णा भावसार (बोहरे), मुख्याध्यापक जे. एस. देवरे व यांनी केले. त्याच्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. एस अमृतकर, श्रावण पाटील, प्रशांत वंजारी, स्वाती माळी, डिंपल देसाई, योगिता महाजन यांनी अभिनंदन केले आहे.




