
अमळनेर:- तालुक्यातील पातोंडा येथे दत्त विद्यामंदिर शाळेत सलाम मुंबई फाउंडेशन व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी सोबत जाणीव जागृती अभियान राबवण्यात आले.
सलाम मुंबई फाउंडेशनचे अधिकारी राकेश कासार तसेच आधार संस्थेचे समन्वयक दिपक संदानशिव, मुरलीधर बिरारी, तोसिफ शेख यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियान या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांसोबत तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखू मुळे होणारे विविध आजार तसेच तंबाखू मधील वापरलेली रसायने व त्याचे शरीरावरील दुष्परिणाम यासंदर्भात राकेश कासारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांच्या माध्यमातून यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. मुरलीधर बिरारी यांनी विद्यार्थ्यांना गाव पातळीवरील नागरिकांसोबत तसेच पान टपरीवाले यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीने जनजागृती करावी यावर मार्गदर्शन केले. तसेच आपल्या कुटुंबातील, नातेवाईक मंडळी यांना विद्यार्थ्यांकडून कशा पद्धतीने संवाद साधता येईल व तंबाखू सोडवण्याची पद्धती यावर मार्गदर्शन केले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी गावात महिला पुरुष व गावातील तरुण मंडळी यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्यासोबत जनजागृती करण्याचा प्रयत्न देखील केला. या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी हर्षल पाटील, जयेश माळी, हर्षल कैलास पाटील, धनश्री मोतीराळे, दिया संदानशिव, दिव्या पवार, प्रणाली पाटील, रितेश पवार या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला




