
पोलीस पाटील दिनानिमित्त मारवड पोलिस ठाण्यात कार्यशाळा संपन्न…
अमळनेर:- पोलीस व महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील पदाची निर्मिती शासनाकडून करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने आज ही सर्व विभागांसाठी पोलीस पाटलांचे सहकार्याची गरज भासते म्हणूनच आजही पोलीस व महसूल प्रशासनातील कार्यात पोलीस पाटलांकडून मिळणाऱ्या माहितीने प्रशासकीय कार्यात मदत होते असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी पोलीस पाटील दिनानिमित्त मारवड येथे आयोजन कार्यक्रमात केले, तर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध जुना व नव्या कायद्याची अंमलबजावणी तसेच आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत गाव पातळीवर पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची असणार आहे असे मत अंमळनेर विभागाचे प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार स्मिता वाघ,तहसीलदार रुपेश सुराणा,सहायक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, पीएसआय विनोद पाटील,गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील,पत्रकार डॉ. विलास पाटील, शांतता समितीचे सदस्य पत्रकार वसंतराव पाटील, आदींची उपस्थिती होती. यावेळी मदतकार्यात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस पाटील यांना प्रशस्तीपत्र देत कार्यतत्पर पोलीस पाटलांचे कौतुक प्रांत नितीन मुंडावरे यांच्याहस्ते करण्यात आले.
मारवड परिसर पोलीस पाटील संघटना दरवर्षी पोलीस पाटील दिन साजरा करत असते, या वर्षी मारवड पोलीस ठाण्यात पोलीस पाटील दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन पोलीस पाटलांकडून करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ,प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेश सुराणा यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा, मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील ,पीएसआय विनोद पाटील,शांतता समितीचे सदस्य पत्रकार वसंतराव पाटील यांनी पोलीस पाटील दिनाचे महत्व विषद केले, यावेळी पोलीस पाटील संघटनेचे राज्य सदस्य भागवत पाटील,खान्देशअध्यक्ष प्रवीण गोसावी जिल्हाध्यक्ष नरेन्द्र शिंदे, जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, पारोळ्याचे दिनकर पाटील, पत्रकार यदुविर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रांताधिकारी व प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार पोलीस संघटनेचे तालुकाध्यक्ष गोविंदा शिंदे संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील, जिल्हा सचिव व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा यानी पोलीस पाटलांची नेहमीच मदत होत असल्याचे सांगून वेळोवेळी शासन प्रशानास सहकार्य अपेक्षित असतेच तर कायदा सुव्यवस्था हाताळताना पोलीस पाटलांची मदत सहकार्य होते म्हणून गुन्हेगारीवर आळा बसवता येतो असे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यानी मनोगतात सांगत शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक मारवड परिसर पोलीस पाटील मित्र परिवाराने परिश्रम घेतले . कार्यक्रमास तालुक्याभरातून सर्व पोलीस पाटील व मारवड परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील गणेश भामरे यांनी तर प्रास्ताविक पोलीस पाटील दत्तात्रय ठाकरे यांनी केले. आभार प्रदर्शन महिला पोलीस पाटील तनुजा शिंदे यांनी मानले.




