
उपक्रमशील शिक्षिकेने त्यांच्या जीवनात निर्माण केला गोडवा…
अमळनेर : कष्टकरी कामगार महिलांचे हळदीकुंकू आयोजित करून त्यांना साडी भेट देऊन छाया अशोक इसे या उपक्रमशील शिक्षिकेने त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे.

श्रीमंत महिला विविध कार्यक्रमातून जीवनाचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा आनंद लुटत असतात. परंतु कष्टकरी महिलांच्या जीवनात दिवसभर काबाडकष्ट शिवाय काहीच नसते. त्यांच्या जीवनातील आनंद हिरावलेला असतो. खडी खदान वर काम करणाऱ्या महिलांचे जीवन असेच कष्टदायक असते. गावाबाहेर सर्वसामान्य लोकांपासून दूर आणि दिवसभर दगड मातीत राबणे एव्हढेच त्यांचे जीवन असते. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका छाया अशोक इसे यांनी धनदीप बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई अवकाळे यांच्या प्रेरणेने कष्टकरी महिलांचे दुःख ओळखून त्यांच्या जीवनात गोडवा आणि आनंद निर्माण करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील देवळी येथील खडी खदान वर जाऊन ३० महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांना साड्या भेट देण्यात आल्या. यावेळी श्रद्धा पाटील, विजया पाटील, प्रियंका पाटील, सुवर्णा निळ हजर होत्या.




