
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताकदिन उत्साहपूर्ण आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच आशाबाई पवार, उपसरपंच भिकण पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, मारवड विकास मंचचे अध्यक्ष राकेश गुरव व सर्व सदस्य, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, तलाठी, पालक व ग्रामस्थ बंधू- भगिनी, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते. ध्वजारोहण समिती अध्यक्षा ललिता विजय साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त कन्या शाळेत विविध क्रीडा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे समाधान सुभाष शिंदे यांच्यामार्फत देण्यात आली. एकूण ३६ विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. त्याचप्रमाणे विजय रमेश पाटील यांच्यामार्फत सर्व शालेय विद्यार्थ्यांना लेखन साहित्य देण्यात आले .या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी संगीत कवायत, वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. कुमारी नूतन चेतन चव्हाण हिने भारत मातेची वेशभूषा केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मोरे सर यांनी केले.




