
अमळनेर :- तालुक्यातील येथील ग्रामपंचायत कामाची तात्काळ चौकशी करा याबाबत प्रवीण चौधरी यांनी आमरण उपोषण सुरू करताच २७ रोजी अहवाल मुख्याधिकारी यांच्याकडे पाठवला.

२६ रोजी सकाळी उपोषण प्रवीण काशिनाथ चौधरी यांनी सुरू केले होते. गटविकास अधिकारी एन. आर. पाटील हे उपोषणस्थळी अहवाल पाठवत असल्याचे पत्र घेऊन गेले.
व सदर पत्र मिळताच उपोषण सुटले.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी गटविकास अधिकारी यांना तात्काळ चौकशी अहवाल दाखल करण्याबाबत आदेश केले असताना चौकशी पूर्ण न करता चौकशीत दिरंगाई होत असल्याने प्रवीण चौधरी यांनी म्हटले आमरण उपोषण करत अमळगाव ग्रामपंचायतीत केलेल्या भ्रष्टाचाराचे कागदोपत्री पुरावे दाखल केलेले आहेत. यापुर्वी वस्तुनिष्ठ केलेली चौकशी ही अपूर्ण तसेच सुस्पष्ट नसल्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी सदर बाबतीत स्वयंस्पष्ट अहवाल दाखल करणेबाबत गट विकास अधिकारी यांना आदेश केलेले होते. परंतु मुदत उलटुनही सदर प्रकरणात कोणतीही चौकशी केलेली नाही. चौकशीत दुर्लक्ष करीत असल्यामुळे प्रवीण चौधरी यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते.




