
स्नेह संमेलनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण…
अमळनेर — शहरातील श्री नारायणदास तेजकरण मुंदडा प्राथमिक विद्यामंदिर व स्व.श्री.मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले .
मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा व मुंदडा फाउंडेशनचे चिटणीस योगेश मुंदडा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले .संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा अध्यक्षस्थानी होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या कलाकुणांचे प्रदर्शन घडविले .राजमाता जिजाऊ ,छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा, देशभक्तीपर गीते , नारीशक्ती , लावणी ,व्यसनमुक्तीवर आधारित नाटिका , मोबाईलवर आधारित नाटिका ,स्वच्छतेवरील नाटिका, समाजप्रबोधन पर नाटिका सादर केले. सामाजिक, देशभक्तीपर अशा विविध ३५ बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सादरीकरणाला पालकांसह विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, नाटिकेतील अभिनयामुळे उपस्थितांची मने जिंकली.विलास साळुंखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .
त्यानंतर शाळेतील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या ४५ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी विविध क्षेत्रात नोकरीवर रुजु झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.माजी विद्यार्थीर्नी अनिता जाधव हिने मनोगत व्यक्त करून शालेय आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात प्रकाश मुंदडा यांनी सांगितले की, स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुण सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ .विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून उज्वल यश संपादन करावे .विद्यार्थ्यांच्या सत्कारांमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढत असल्याचे सांगितले .शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी यावेळी कौतुक केले .
कार्यक्रमाला पी.एस.विंचुरकर , धनराज महाजन , अविनाश पाटील , डी एन पाटील, योगेश चौधरी , एच एम पाटील , गोकुळ बोरसे , गोकुळ पाटील, दिपक पाटील , अनिल माळी, चेतन पाटील यांची उपस्थिती होती. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पाटील यांनी केले .
सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन भारती पाटील व सुनिल पाटील यांनी केले.स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.




