
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथील संगीता गणेश पाटील वय ३४ हीने २९ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरी छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

गावकऱ्यांनी महिलेला खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. महिलेचे जेठ प्रकाश अशोक पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.




