
अमळनेर:- येथील तालुका मराठा समाज महिला मंडळाचा ९वा वर्धापन दिन ३० रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली त्यानंतर अध्यक्ष तिलोत्तमा पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले.

खजिनदार पद्मजा पाटील यांनी मागील वर्षाचा हिशोब सादर केला व अहवाल वाचन केले ,लीना ताई पाटील यांनी सूत्रसंचालन करीत कार्यक्रमात रंगत भरली महिलांचे विविध खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या .२०१६ जानेवारीत मकरसंक्रांत हळदीकूंकुच्या कार्यक्रमापासुन या मंडळाची सुरूवात झाली. अध्यक्षा तिलोत्तमा पाटील यांच्या संकल्पनांतुन या मंडळाची सुरूवात झाली. त्यांना जयश्री अनिल पाटील, सुलोचना वाघ, सुनिता पाटील, अलका पाटील, मंगला पाटील, भारती पाटील(आधार संस्था) ,सौ. शिला पाटील, कमलआक्का पाटील, प्रभा पवार, माधुरी पाटील, मनिषा पाटील, रागिणी पाटील, पद्मजा पाटील, भारती पाटील, लीना पाटील या सर्वांची साथ लाभली. सुरूवातीला ५० सभासद पासुन आज ५०० सभासद झालेत. दर वर्षी हळदीकुंकूचा कार्यक्रमापासुन सुरुवात होते. महिला दिन, नवरात्र, कोजागरी असे पारंपरिक कार्यक्रम होतात




