
आज जळगाव येथे रंगणार सेमी फायनल
अमळनेर-जळगाव येथे सुरू असलेल्या पत्रकार प्रीमियर लीग स्पर्धेत अमळनेर येथील पत्रकारांच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

उत्कृष्ट संघभावना आणि खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर अमळनेर संघाने एरंडोल संघावर सहज विजय मिळवला.पहिल्या दिवशी अमळनेर संघाने चोपडा संघाला गारद करत क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला होता.दिनांक 11 रोजी क्वार्टर फायनल मध्ये आर. जे. पाटील यांनी तुफानी फलंदाजी करत 64 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्यामुळे संघाला विजयी बढ़त मिळाली. या यशामुळे अमळनेरमधील पत्रकार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता सर्वांचे लक्ष सेमी फायनल च्या प्रदर्शनाकडे लागले आहे.सेमी फायनल आज दिनांक 12 रोजी सायंकाळी जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर होणार आहे.




