
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ, संचलित ग्रामविकास शैक्षणिक संकुलात संस्थेशी संबंधित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड, सु.हि.मुंदडे हायस्कूल व श्रीमती. द्रो.फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड,न्यू इंग्लिश स्कूल प्र. डांगरी आणि विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजन केलेले होते.

या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अनिल भाईदास पाटील हे होते. उद्घाटक म्हणून माजी आमदार पाटील, सरपंच श्रीमती. आशाबाई सुभाष भिल तसेच संस्थेचे अध्यक्ष जयंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील, सेक्रेटरी देविदास बारकू पाटील व सर्व संचालक उपस्थित हे होते,स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अनिल पाटलांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष यांनी केला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाचे व्यासपीठ हे महत्त्वाचे असते.म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, व आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन जीवनात यशस्वी व्हावे. असे मौलिक मार्गदर्शन याप्रसंगी केले.अनेक गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर पीएचडी मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. विश्वनाथ पाटील व विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक व शिक्षकांचाही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात आपल्या कलागुणांचे जल्लोषात दर्शन घडविले,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले.याप्रसंगी व्यासपीठावर प्रभावती पाटील,जि. प.सदस्य शांताराम पाटील, तिलोत्तमा पाटील, अॅड. किरण पाटील, सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश किरण पाटील,माजी उपसभापती बाळासाहेब पाटील, अनिल शिसोदे, शितल देशमुख आणि पत्रकार, प्राचार्य, प्राध्यापक, इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी भाग घेतला व कार्यक्रम अतिशय मनोरंजक करण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले.

