
अमळनेर : बियाणे कंपनीत नोकरीला असलेल्या एका युवकाने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ रोजी सकाळी साडे दहा वाजता कलागुरू ड्रीम सिटीत घडली.

देवेंद्र साहेबराव पाटील (वय २७ रा जवखेडी पाथरी ता जि जळगाव हल्ली मुक्काम कुलगुरू ड्रीम सिटी) हा हैदराबादच्या बियाणे कंपनीत नोकरीला होता. त्याने रात्रीपासून दरवाजा उघडलेला नाही असा फोन विक्रांत शिंदे याने प्रशांत अशोक पाटील याला कळवले. देवेंद्र जेथे राहत होता तेथे दरवाजा उघडला असता तो छताला फासावर लटकलेला दिसला. त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रशांत पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील तपास करीत आहेत.




