
अमळनेर : पोलीस स्टेशनचा पदभार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार प्रकाश बारबोले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. १७ फेब्रुवारीपासून ते ११ मार्च पर्यंत ते अमळनेर पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळतील.

केदार प्रकाश बारबोले यांचा परिविक्षाधीन कालावधी असून ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळण्याचा त्यांचा प्रात्यक्षिक कालावधी असल्याने ते पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्याकडून पदभार स्वीकारतील. असे आदेश पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. विकास देवरे यांचे सेवेतील फक्त १५ दिवस उरले असून ते २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. तोपर्यंत ते दुय्यम अधिकारी म्हणून काम पाहतील.




