
अमळनेर :- प्रज्ञासूर्य विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलश अभिवादन कार्यक्रम व धम्मदेसना कार्यक्रम व प्रवचनाचे आयोजन दि.१५ रोजी सायंकाळी ५ वाजता साने गुरुजी विद्यालयात करण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीचे आगमन १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर शहरात होत आहे.प्रथमच त्यागमूर्ती रमाई स्मारक वरळी/चैत्यभूमी दादर-मुंबई ते संदेशभूमी धुळे अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे आगमन आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्ध भिक्खु संघासोबत शहरात दाखल होत आहे.त्यानिमित्ताने पूज्य भन्ते महाथेरो ज्ञानज्योती जी यांच्या धम्म देसना कार्यक्रम आणि प्रवचनाचे आयोजन शनिवारी १५ रोजी सायंकाळी ५ वाजता साने गुरुजी विद्यालयात करण्यात आले असून नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा नियोजन समिती मार्फत करण्यात आले आहे.




