
अमळनेर-जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या पतसंस्थाचे सह फेडरेशनच्या संचालकपदी अमळनेर येथील प्रभाकर शंकर कोठावदे,(बापू वाणी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या पतसंस्थाच्या सह फेडरेशनसाठी 21 जागांसाठी 2025 ते 30 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक होत असून या निवडणुकीत अमळनेर तालुका प्रतिनिधी मतदारसंघात प्रभाकर कोठावदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.सदर निवडीबद्दल त्यांचे चोपडा येथील चंद्रहास गुजराथी, माजी जि प शिक्षण सभापती विकास पाटील,सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्था उंबरखेड चे व्हा चेअरमन योगेश भोकरे यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.




