
अमळनेर– बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची 286 वी जयंतीनिमित्ताने उत्सव समितीने दरवर्षीप्रमाणे शनिवार रोजी सकाळी दहा वाजता भव्य शोभायात्रा व प्रतिमा मिरवणुकीचे आयोजन केलेले असून सदर शोभा यात्रेचा शुभारंभ शासकीय विश्रामगृह येथे होऊन स्टेशन रोड- पाच पावली- तिरंगा चौक- दगडी दरवाजा- राणी लक्ष्मीबाई चौक- सुभाष चौक- स्टेशन रोड मार्गे दौडे गुजर भवन येथे समारोप होणार असून शोभा यात्रेत समस्त समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती अमळनेर तर्फे करण्यात आलेले आहे.




