
अमळनेर :- येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर ,विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आला असून त्यांच्यावतीने नुकतेच शालेय विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले.
शहरालगतच अंबर्शी ऋषी टेकडीवरील बाविस फुट उंची असलेल्या हनुमंत मूर्तीच्या पायथ्याशी शालेय विद्यार्थ्यांना त्याना अभ्यासात एकाग्रता वाढावी या दृष्टीने प्राणायाम, कपालभारती,भ्रमरी ,ओम कार जप यासह विविध योग प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले, योग व प्राणायाम विदयार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा टप्पा गाठण्यासाठी महत्वाची भूमिका निभावतो.ते नियमित केल्याने त्याचे अनेक फायदे विद्यार्थ्यांना होतात.. ते सातत्याने केल्यास शरीर स्वास्थ्य टिकून राहते. या उपक्रमासाठी फिजिओ थेरपीस्ट व योग प्रशिक्षक अनिल दुसाने सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच यासोबतच जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना योग प्राणायाम विषयी संबोधित करतांना योग व प्राणायाम चे महत्व विषद केले.
याप्रसंगी उपाध्यक्ष राजेंद्र भावसार,सेक्रेटरी संदिप महाजन, खजिनदार राजेंद्र पाटील, सदस्य रमेश महाजन, डॉ महेश पाटील,टेकडी ग्रुप चे आशिष चौधरी, युक्ता महाजन व विद्यार्थी उपस्थित होते.




