
अमळनेर- शहरात बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराजांच्या 286 वी जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शासकीय विश्रामगृहात कार्याध्यक्ष अनिल जाधव व अध्यक्ष किरण जाधव, रणजीत राठोड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी तालुक्यातील भरवस,लोण, जवखेडा, रणाईचे, ढेकू,सारबेटा, डांगर, रामेश्वर, खेडीतांडा येथील बालगोपाल, युवक, महिला व पुरुष समाज बांधवांनी पांढऱ्या रंगाचे जय सेवालाल महाराजांचे फोटो असलेले ध्वज मिरवत डीजेच्या तालावर नाचत बस स्टॅन्ड- पाचपावली चौक- तिरंगा चौक- दगडी दरवाजा -राणी लक्ष्मीबाई चौक- सुभाष चौक- स्टेशन रोड मार्गे भव्य शोभायात्रा काढण्यात येऊन दोडे गुजर भवन येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी बंजारा समाज बांधव परिवारासह तसेच बहुसंख्य महिला पारंपारिक वेशात या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी शोभायात्रेत सहभागी सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन उत्सव समितीतर्फे करण्यात आले होते. शोभायात्रेसाठी उत्सव समिती सदस्य एकनाथ जाधव, संजय राठोड, राजेश राठोड, रमेश पवार, प्रकाश पवार, सुरेश चव्हाण, पुना जाधव, ईश्वर पवार, किशोर पवार, रमेश चव्हाण, सुभाष चव्हाण, यांनी अथक परिश्रम घेतले.




