
अमळनेर (प्रतिनिधी) युवासेना व भरत पवार मित्रपरिवार आणि जळगाव येथील गोदावरी फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबीरात 238 लोकांनी सहभाग घेतला. ख्वाजा नगर येथे झालेल्या शिबिरात शिवसेना जिल्हाप्रमुखांनी शिबीरास भेट दिली.
हृदयरोग, जनरल मेडिसिन, महिला रोग कान नाक घसा शस्त्रक्रिया नेत्रालय अस्थिरोग विभाग करून रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात मोफत इसीजी, कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी करण्यात आली. शस्त्रक्रिया विभागात विविध प्रकारच्या गाठी, थायरॉईड, पाइल्स भगंदर, फिशर, डायबिटीस फूट, हर्निया, अल्सर आतड्यांमधील अडथळे अपेन्डिस आतड्यातील बीड आतड्यांच्या क्षयरोग हायड्रोसिल अजयची तपासणी करण्यात आली. तसेच मोफत एन्जोप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया साठी टू डू इको फेस मेकर रिनल इंजोप्लास्टी, आदी तपासणी केली.
ऑपरेशनसाठी काही लोक येत्या सतरा तारीख सोमवारी गोदावरी फाऊंडेशन येथे जाणार आहेत. यावेळी तालुकाप्रमुख प्रथमेश पवार, शहरसंघट साकरलाल महाजन, धर्मवीर अध्यात्मिक सेना सन्मवयक बहीरम सर, यूवासेना तालुकाप्रमुख गुणवंत पाटील, वैद्यकीय कक्ष सेना तालुकाप्रमुख प्रमोद शिंपी, उपशहरप्रमुख प्रविण पाटील, उपशहरप्रमुख प्रकाश शर्मा उपस्थित होते. शिबीराला शोयब शेख शरीफ शेख, इबादादा शेख, शबीर शेख, महंमद सैय्यद महंमद अरब, जूबेर शाह, आकाश महाले, मूकेश साळुंखे, प्रमोद गोयकर यांनी कार्यास सहकार्य केले.




